जेष्ठ नागरिकांसाठी शनिवारी सेवा रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन
schedule25 Jul 25 person by visibility 199 categoryआरोग्य

▪️एमआरआय, सीटी स्कॅन, कॅथ लॅब, आयपीएचएल लॅबचा होणार शुभारंभ
कोल्हापूर : मुख्यमंत्री गतिमानता अभियानातील 100 कलमी कार्यक्रमांतर्गत जेष्ठ नागरिक आरोग्य शिबीराचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. तसेच एम.आर.आय, सी.टी स्कॅन, कॅथ लॅब व आय.पी.एच.एल लॅब या प्रस्तावित योजनांचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य शिबीरात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून चष्मे वाटप, वयोवंदना कार्ड वाटप, श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा तपासणी, २ डी इको (2D Echo) होणार असून तपासणी अहवाल त्वरीत देण्यात येणार आहे. तसेच पुढील उपचाराकरिता आवश्यकता असल्यास संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा,
असे आवाहन आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.