SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमानकोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणबिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्न

जाहिरात

 

थोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावना

schedule07 Aug 26 person by visibility 154 categoryराज्य

◼️मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहासह प्रायव्हेट हायस्कूल सभास्थळाची केली पाहणी
 ◼️दोन्हीही ऐतिहासिक वास्तूना मिळाले आहे गतवैभव         
         
कोल्हापूर : कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय. सीपीआर ही गोरगरिबांची आरोग्यदायीनी आहे तर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूर शहराची अस्मिता आहे. या दोन्ही नूतनीकृत वास्तूंचे लोकार्पण रविवारी दि. ९ मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. 
        
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे व प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील सभा स्थळाला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
           
मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर समस्त कोल्हापूरवासीयांच्या हृदयाला अक्षरशः चटका लागला होता. त्यावेळी मी पालकमंत्री होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले. सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापुरात आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांनीही कोल्हापुरात येऊन याची सविस्तर पाहणी केली होती. त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा नव्या दिमाखात, गतवैभवात फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहील.

​त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने २५ कोटी रुपये निधी दिला आणि विम्याचे १० कोटी रुपये, अशा प्रकारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्ऊभारणी झाली आहे. हे नाट्यगृह साक्षात फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पूर्वीच्याच गतवैभवात आणि नव्या दिमाखात उभे राहिलेले आहे आणि समस्त रंगकर्मींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महापालिका आणि महाराष्ट्र राज्य सरकारने केलेला आहे.
​               
 मुश्रीफ  म्हणाले, या नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी रविवारी दि.  ९ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येत आहेत. नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या, नाट्यरसिकांच्या सेवेत हे नाट्यगृह दाखल होईल.
       
नाट्यगृहाच्या खाजगीकरणावर प्रश्न विचारला असता मंत्री  मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेने या नाट्यगृहाबाबत काय निर्णय घेतलेला आहे, याबाबतची आता मला माहिती नाही. ती माहिती घेऊन मी पुन्हा बोलेन.  ते चालवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाऊ शकते. सरकारी इमारतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याची डागडुजी आणि निगा राहावी यासाठी ते चालवण्यासाठी दिल्यास इष्ट होईल, असे माझे मत आहे. 
​         
दरम्यान, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत विचारले असता  मुश्रीफ म्हणाले, थोरला दवाखाना म्हणून लौकिक असलेल्या सीपीआर हा गोरगरिबांची आरोग्यदायिनी आहे. या दवाखान्याचे ६०० हून अधिक कोटी निधी खर्च करून नूतनीकरण केलेले आहे. रुग्णांसाठी सर्व अत्यावश्यक व्यवस्था सीपीआरमध्ये निर्माण केलेल्या आहेत. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद करून अतिशय योग्य काम केलेले आहे. जेन झी, अल्फा या पिढ्यांशी कनेक्ट होण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, यामध्ये जेन झीची काही चूक नाही, त्यांना समजून घेण्यात आपलीच चूक झालेली आहे.
      
◼️समाधान आणि भाग्यही......!
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, रविवार दि. ९  रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती येत आहे. त्याच दिवशी या नूतनिकृत केलेल्या दिमाखदार वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. हा मोठा सुवर्णयोगच आहे. अवघ्या दोन वर्षाच्या आतच ही वास्तु पूर्ण झाली. या कामांमध्ये हातभार लावू शकलो याचे मला फार मोठे समाधान आहे आणि ते मी माझे भाग्य समजतो.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes