SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमानकोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणबिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

जाहिरात

 

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

schedule07 Aug 26 person by visibility 128 categoryराज्य

  कोल्हापूर : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात दि. 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनाने विविध विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  ‘विभाजन विभीषिका स्मृतीदिन’ निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम, नाट्य, प्रदर्शन, शॉर्ट फिल्म तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत MyGov पोर्टलवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, प्रदर्शन, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’, रांगोळी आदी उपक्रमांचा समावेश आहे.

  तसेच ‘वंदे मातरम्’ गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिरंगा सेल्फी तसेच वंदे मातरम् गीत असलेले व्हिडिओ HarGharTiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालये तसेच संबंधित शासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महामंडळे, शाळा व महाविद्यालयांमध्ये तिरंगा रंगाची रोषणाई, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes