SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लोकसेवेचा वारसा व बाळासाहेबांचे विचार अखंड पुढे नेणार : आ. राजेश क्षीरसागरआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणजुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी जयसिंगपूर : २ कोटींच्या निधीतून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभशिरदवाड आणि शिवनाकवाडीच्या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६२ नागरिकांची तपासणीकोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंती

जाहिरात

 

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस

schedule06 Feb 26 person by visibility 1078 categoryगुन्हे

कोल्हापूर  : घरफोडी करणाऱ्या आरोपी अटक करण्यात आली. त्याच्याकडून करवीर पोलीस ठाण्यात दाखल झालेले एकूण 14 घरफोडीचे गुन्हे  उघडकीस आले. 230.190 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी व इतर साहित्य असा एकूण 44,68,050/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली .

तपास पथकातील पोलीस अमंलदार दिपक घोरपडे व प्रविण पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. मिळाले माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी अशा पथकाने दि.27.01.2026 रोजी उजळाईवाडी गांवचे हद्दीत भारती विद्यापीठ कडून हायवे रोडवर येणारे कॉर्नरजवळ सापळा लावून आरोपी  प्रताप सुरेश कदम, वय 31, रा. शिवाजी चौक कासारवाडी, शिरोली एम.आय.डी.सी. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. नक्षत्र पार्क शिक्षक कॉलनी पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील 3,00,000/-रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे सोन्याचे दागीन्यासह पकडले.

 करवीर पोलीस ठाणे, गु.र.नं. 693/2025, बी. एन. एस. 331 (3), 331 (4),305 (अ) प्रमाणे दाखल गुन्हा तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेवून आरोपी प्रताप सुरेश कदम यास नमुद गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला. तपासात त्याने गेले दोन वर्षापासून कोल्हापूर शहरालगत असले उपनगरात रात्रौंचे वेळी घरफोडी-चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी हाशिरोली एम.आय.डी.सी. येथील राहणारा आहे परंतू तो गेले तीन वर्षापासून पाचगांव, ता. करवीर परिसरात भाडयाने राहत आहे. आरोपी हा कोणताही कामधंदा करीत नाही परंतू शहरालगत असले उपनगरात राहणेस असलेने त्याने राहत असले परीसरात आसपासचे परीसरात रात्रौचे वेळी पायी चालत जावून बंद असलेली घरे लक्ष्य करुन घरफोडी चो-या केलेचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रताप सुरेश कदम याचेकडून आज तपासामध्ये 230.190 ग्रॅम सोन्याचे व 3 किलो चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण 44,68,050/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक,  योगेश कुमार , व  अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धिरजकुमार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes