सिपेटतर्फे युवक-युवतींसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण
schedule10 Dec 25 person by visibility 43 categoryराज्य
कोल्हापूर : पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), औरंगाबाद (रसायन व पेट्रोरसायन विभाग, भारत सरकार) यांच्या वतीने निःशुल्क रोजगाराभिमुख निवासी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील SC, ST, OBC, EWS व PWD प्रवर्गातील युवक-युवतींसाठी चार महिन्यांचा नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सॅबीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SIPL) यांच्या CSR अंतर्गत सिपेटतर्फे मशिन ऑपरेटर – प्लॉस्टिक प्रोसेसिंग (MO-PP) या 4 महिन्यांच्या (600 तास) कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण 55 जागा असून वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. मागास प्रवर्गांसाठी शिथिलता लागू आहे.
पात्रता - 10 वी किंवा 11 वी उत्तीर्ण आणि 1.5 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा 8 वी उत्तीर्ण व 4.5 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा संबंधित NSQF लेव्हल स्तर 3 व 1.5 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा - 5 वर्ष अनुसूचित जाती/जमाती करीता आणि 3 वर्ष इतर मागासवर्गीयांकरीता शिथिल. प्रशिक्षण पूर्णपणे निवासी असून राहण्याची व जेवणाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. पूर्वी सिपेट, औरंगाबाद येथून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत. उमेदवारांची मुळ कागदपत्रांची तपासणी व मुलाखत याद्वारे निवड करण्यात येईल. मुलाखतीसाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
इच्छुक उमेदवारांनी साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे व फोटोसह अर्ज सिपेट, औरंगाबाद येथे पाठवावेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9325687910 / 9601364550 / 9145675585 वर संपर्क साधावा.