कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या घरातून १२ कोटी रुपयांची रोकड जप्त; ईडीकडून अटक
schedule23 Aug 25 person by visibility 311 categoryदेश

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने आमदारांच्या निवासस्थानातून १२ कोटी रुपये रोख आणि सुमारे ६ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
या कारवाईनंतर काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ऑनलाइन बेटिंग चालवण्याचा आरोप आहे.
ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा फक्त एक दिवसापूर्वी संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाले होते.