SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : तावडे हॉटेल ते कावळा नाका चौक परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईथकीत घरफाळाधारकांवर सक्तीच्या कारवाईचे आयुक्तांचे आदेशशिरोळ नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत वर्ग करण्याचे आदेशराधानगरी भरले 93 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 34.5 मिमी पावसाची नोंदकोल्हापुरात २ ऑगस्ट रोजी पहिले ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’; डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष, तर शाहिर दिलीप सावंत असणार उद्घाटक!शहरात प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाईजागतिक निसर्ग संवर्धन दिन: वसुधैव कुटुंबकम् आणि निसर्गाचे रक्षण हीच काळाची गरजराज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन

जाहिरात

 

थकीत घरफाळाधारकांवर सक्तीच्या कारवाईचे आयुक्तांचे आदेश

schedule28 Jul 26 person by visibility 199 categoryसामाजिक

कोल्हापूर : शहरातील थकीत घरफाळा वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घरफाळा विभागास दिले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज घरफाळा विभागाची लिपिकनिहाय आढावा बैठक घेणत आली.

आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी बोलताना चांगली वसुली करणाऱ्या लिपिकांचे कौतुक केले, तर कमी वसुली असलेल्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ३५ टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाऱ्या लिपिकांना नोटिसा देण्याचे तसेच अत्यल्प वसुली करणाऱ्यांचा पगार तातडीने रोखण्याचे आदेश त्यांनी करनिर्धारक व संग्राहकांना दिले. पुढील महिन्यापर्यंत कामगिरीत सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. शहरातील अनधिकृत मिळकती, भाडेकरू वापर असूनही मालक वापराप्रमाणे आकारणी झालेल्या प्रकरणांची तातडीने दुरुस्ती करून दंडासह वसुली करावी, तसेच अनधिकृत लॉजिंग व व्यावसायिक मिळकतींवर आवश्यकतेनुसार सीलची कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले.

 थकबाकीदारांना तत्काळ नोटिसा व एसएमएस पाठविणे, शहरातील सर्व पात्र मिळकतींना घरफाळा आकारणी करणे आणि व्यावसायिक मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नियमित घरफाळा भरणाऱ्या नागरिकांना त्रास न देता अधिकारांचा योग्य वापर करून थकबाकीदारांवर कारवाई करावी, तसेच दर १५ दिवसांनी वसुलीचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, करअधीक्षक अशोक यादव, मदन ठाणेकर, दत्तप्रसाद माजगांवकर, अच्युत अडुकर, अधिक्षक अर्चना प्रभावळे तसेच घरफाळा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes