अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी : सतेज पाटील : बारामतीत पवार कुटुंबांचे केले सांत्वन
schedule30 Jan 26 person by visibility 178 categoryसामाजिक
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे. हा धक्का इतका मोठा आहे की, राज्याच्या राजकारण आणि समाज जीवनातील पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
आमदार पाटील यांनी शुक्रवारी बारामतीत जाऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहीत पवार यांची भेट घेत पवार कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी अजित पवार यांनी वैयक्तिक संबंध सातत्याने जाेपासले.
त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिकरित्या बसलेला हा धक्का शब्दांच्या पलीकडचा असून, अंतःकरण सुन्न करून टाकणारा आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.