डीकेटीई म्हणजे उज्वल करिअरची हमी ः रवी आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला प्रेरणादायी कानमंत्र
schedule01 Sep 25 person by visibility 349 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : जगभरातील स्पर्धात्मक परिस्थीतीला समर्थपणे तोंड देणारे, नवकल्पनाशिल व गुणवत्तापूर्ण अभियंते घडविण्याची ऐतिहासिक परंपरा डीकेटीईची आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात सक्षम अभियंते घडविण्याची क्षमता आणि सामर्थ्य डीकेटीईमध्ये आहे असे प्रतिपादन डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल व इंजिनिअरींग, डिप्लोमा, एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले.
देशातील कानाकोपा-यातून विविध पार्श्वभूमी व जिज्ञासू वृत्ती घेवून येणा-या विद्यार्थ्यांना नविन वातावरणाशी जुळवूण घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांच्यात आत्मीयता निर्माण करणे व भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करणे हा या स्वागतसमारंभाचा मुख्य हेतू आहे. घोरपडे नाटयगृह, इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे होत्या.
यावेळी बोलताना रवी आवाडे यांनी, सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक प्रेरणादायी मंत्र सांगितले हे सांगत असताना इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस, तसेच संस्थेतील आयडीया लॅब, फायजी लॅब याचा विद्यार्थीदशेत चांगला रिसर्चसाठी वापर करावा तसेच विद्यार्थ्यांनी देशहीत तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा अशा अनेक मुलभूत गोष्टी रवी आवाडे यांनी नवीन विद्यार्थ्यांना सांगितल्या. डीकेटीईमध्ये उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानानचे भांडार आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी ज्ञानाने समाज, देश आणि डीकेटीईचा असाच नावलौकीक वाढवावा असे सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच जगभरातील विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्यामध्ये डीकेटीई ही संस्था देशात आघडीवर आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्या आपल्या उद्योगात डीकेटीई मधील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास इच्छुक असतात असे उदगार काढले त्यांनी क्रेडिट ट्रान्सफर स्कीम बददल माहिती दिली तसेच विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण मोठया शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असते. यावरुन संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण अधोरेखित होते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली. प्रा. एस.ए. पाटील यांनी ‘सॉग ऑफ युथ‘ हे सर्वाना सांगितले. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी समन्वय साधत आपले अभ्यासक्रमातील अधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी मार्गदर्शन केले. डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबददल माहिती सांगितली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रा.एस.बी.अकिवाटे यांनी गतवर्षी उच्च पॅकेजवरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे उल्लेखली. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या, प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम.एस.अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मानद सचिव डॉ सपना आवाडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा.आर.के.वळसंग यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. शिवतेज पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पाटील व सच्चितानंद यांनी केले. कार्यक्रमास सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, टेक्स्टाईल व इंजिनिअरींग टीपीओ, ऑफीस प्रमुख, करिअन गायडन्स सेल प्रमुख, क्रिडाप्रमुख, लायब्ररी प्रमुख आदींची उपस्थिती होती.