SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्नधर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामापंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजापेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्चपाऊलखुणा न्यायाच्या आणि समानतेच्या: ‘आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस’नीट पेपर लीक: केंद्र सरकारची कठोर कारवाई; एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टीवारीच्या सेवेतून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंढरपुरात 'निर्मलवारी-समृद्धवारी' व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप संपन्न

जाहिरात

 

आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्न

schedule25 Jul 26 person by visibility 104 categoryराज्य

कोल्हापूर : मुंबई आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. 

 यावेळी रुग्णालयातील आरोग्य सेवा , स्वच्छता, रुग्णाभिमुख सुविधा व सेवा वितरणाच्या गुणवत्तेची माहिती घेत रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक असल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. याप्रसंगी आशा स्वयंसेविकांनीआपल्या कामातील अनुभव,अडचणी, सूचना आयुक्तांसमोर मांडल्या.           

  दरम्यान चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर काटकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.प्रारंभी उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी विभागातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची सद्यस्थिती,उपलब्धी,आव्हाने तसेच आगामी नियोजन यांचा आढावा आपल्या प्रस्ताविकामध्ये घेतला तसेच आभार ही व्यक्त केले .

 या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य व क्षयरोग अधिकारी तसेच मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी,हिवताप अधिकारी , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes