विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू
schedule28 Jan 26 person by visibility 190 categoryराज्य
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्थेने या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अजित पवारांच्या चार प्रचार सभा होणार होत्या त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात झाला विमान जवळच्या शेतात कोसळलं. विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.