कोल्हापूर महापालिका शाळांमधील प्रश्न समन्वयाने सोडवू : आप व मुख्याध्यापकांच्या बैठकीतला सूर
schedule15 Jan 25 person by visibility 165 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रशासनासोबत राबवण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे.
कोल्हापूर शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता. याबाबत तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत वि स खांडेकर शाळेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापकांनी शाळा आणि परिसरामध्ये असलेल्या अडचणी बैठकीत बोलून दाखवल्या. शाळेतील पायाभूत सुविधा, नवीन क्लासरूम, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, अतिक्रमण, क्रीडा साहित्य आदी प्रश्नांवर आप पदाधिकारी व मुख्याध्यापक यांच्यात चर्चा झाली.
महापालिकेने मागील दहा वर्षांपासून शाळेतील सेवक इतर विभागामध्ये वापरल्याने अनेक शाळांमध्ये सेवक नाहीत. त्यामुळे शाळेची स्वच्छता, देखभाल करता येत नसल्याचे मुख्याध्यपकांनी बैठकीत सांगितले.
ओपन बार बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी करणार आहे. जर ओपन बार बंद झाले नाहीत तर तळीरामांचं दांडकं घेऊन स्वागत करण्याचा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.
या बैठकीला सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, विजय माळी, दत्तात्रय पाटील, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, सर्व मुख्याध्यापक, तसेच आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, संजय नलवडे आदी उपस्थित होते.