अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! राष्ट्राध्यक्षांचा शानदार शपथविधी
schedule21 Jan 25 person by visibility 465 categoryविदेश

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथग्रहण कॅपिटल हिलच्या रोटुंडा हॉलमध्ये पार पडला. या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 10 वाजून 30 मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वप्रथम जेडी व्हान्स यांनी उप राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली त्यानंतर चिफ जस्टीस जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. डोनाल्ड ट्रंप यांची कन्या ट्रम्प यांची मुले इवांका ट्रंप, डोनाल्ड ट्रंप ज्युनियर, टिफनी ट्रंप, एरिक ट्रंप आणि बॅरन ट्रंप हे घरातील सदस्यही यावेळी शपथविधीला उपस्थित होते.
अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला.