करवीर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आयोजित भव्य गड किल्ले बनवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण उत्साहात
schedule05 Nov 25 person by visibility 62 categoryसामाजिक
कोल्हापूर: करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव मर्यादित भव्य किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली होती. शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात. मुलांना आपल्या गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण राहावे व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. किल्ले बनविणे या स्पर्धेला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण ३५ ग्रुप व मंडळांनी यामध्ये किल्ले बनवून सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभ उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर येथे संपन्न झाला.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवविचारांची गोडी लागावी हाच उद्देश ठेवून ही स्पर्धा आयोजित केली जात असून मुलांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बाबी वापरून हुबेहूब किल्ले बनवून किल्ले बनविणे स्पर्धेला सार्थकी लावले याचे मनापासून समाधान वाटत आहे.
उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, किल्ले बनविण्याच्या स्पर्धेमध्ये लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांचा व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास खऱ्या अर्थाने जागृत झाल्याचे समाधान मिळाले पण मुलांनी फक्त गडकिल्ले बनविण्या पुरते मर्यादीत न राहता शिवरायांचे विचार आचरणात आणावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक माने पार्क वेताळगड, दुसरा क्रमांक संघर्ष मित्र मंडळ प्रतापगड किल्ला, तिसरा क्रमांक शिवशक्ती तरूण मंडळ व चौथा क्रमांक जय शिवराय तालीम मंडळ रेडेकर गल्ली प्रतापगड किल्ला यांचा आला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १५०१, १००१ रुपये व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ शिवशक्ती बालगट यादववाडी मुली तोरणा किल्ला, विठ्ठलाई पार्क पुरंदर किल्ला, छत्रपती राजाराम तरुण मंडळ राजाराम तलाव साल्हेर गड, अमोल म्हसवेकर रायगड किल्ला, अवनीश अरुण पाटील प्रियदर्शनी कॉलनी प्रतापगड, जय शिवराय तालीम मंडळ प्रतापगड, मंथन सुतार प्रियदर्शनी कॉलनी शिवनेरी किल्ला, एल कॉर्नर पन्हाळगड, आलोक सरनाईक प्रियदर्शनी कॉलनी प्रतापगड, रिदम ग्रुप प्रतापगड, सरस्वती कॉलनी राजगड, हिंदवी स्वराज मंडळ मल्हारगड, जाखले सुतारमळा प्रतापगड, मंगोबा तालीम प्रतापगड, श्रीजीत वळकुंजे प्रतापगड, शिवसेना शाखा क्रमांक दोन राजगड, प्रथमेश सुतारमळा तोरणा किल्ला, दत्ता सुतारमळा काल्पनिक गड, गौरव सुतारमळा प्रतापगड, सुतारमळा शिवनेरी, सुरज लोहार प्रियदर्शनी कॉलनी रायगड, एकता तरुण मंडळ प्रतापगड, संभव सूर्यवंशी हिरा कॉलनी प्रतापगड, टेंबलाईवाडी सिंहगड, गगन जैन प्रियदर्शनी कॉलनी पन्हाळा, समर्थ नगर प्रतापगड, सुतारमळा शिवनेरी, मोरया ग्रुप खांदेरी किल्ला, जानकीनगर प्रतापगड, यादववाडी कलानिधीगड यांना बक्षीस सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.शरद माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले
यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपसरपंच श्रीधर कदम, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवासेना माजी तालुकाप्रमुख संतोष चौगुले, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव माने, रवी काळे, शरद माळी, नितीन निकम, विभागप्रमुख अक्षय परीट, शिवाजी लोहार, तंटामुक्त अध्यक्ष दत्ता यादव, रामराव पाटील, आबा जाधव, सुरज इंगवले, राजू साळुंखे, धनाजी पाटील व स्पर्धेमध्ये ३५ लहान मुलांच्या ग्रुपने सहभाग घेतलेला होता हे सर्व ग्रुप कार्यक्रम स्थळी उपस्थित होते त्यांना सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरवण्यात आले.