SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदन

जाहिरात

 

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

schedule26 Nov 26 person by visibility 169 categoryराज्य

मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी शहीद जवानांना अभिवादन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात आयोजित या अभिवादन कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्प अर्पण करून शूर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes