SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

घोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदत

schedule26 Nov 26 person by visibility 155 categoryसामाजिक

जयसिंगपूर : सांगली येथील प्रीतम आनंद वृद्धाश्रम संस्थेस संजय घोडावत फौंडेशन तर्फे पायाभूत सोयी सुविधांसाठी व दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत दरमहा असणार आहे. वृद्धाश्रमाचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती  संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त  विनायक भोसले , सौ विजयाताई  पृथ्वीराज पाटील, अध्यक्ष अभिनय कामाजी  उपस्थित होते.

 संपूर्ण समाजात कोणताही ज्येष्ठ नागरिक एकटेपणा मुळे निराश,हताश होऊ नये आणि कोणत्याही आजी-आजोबांना आपलेपणा ,आपुलकी, प्रेम जिव्हाळा व आत्मसन्मान देण्यासाठी सादर संस्था कार्य करेल असे अध्यक्ष अभिनय कामाजी यांनी सांगितले.

वृद्धाश्रमामध्ये बैठे खेळ कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, चित्रकला, हस्तकला, विणकाम , तबला, गिटार, हार्मोनियम पेटी, पियन बासरी, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप ,पोहण्यासाठी तलाव तसेच धार्मिक वाचनयासाठी वेगळा  हॉल इ.  विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या वृद्धाश्रमासाठी  सर्व आवश्यक ती मदत संजय घोडावत फौंडेशन करेल असे अश्वासन संजय घोडावत यांनी दिले. 

      संजय घोडावत फौंडेशन तर्फे माउली केअर  सेन्टर कोल्हापूर , मिरज येथे अंध शाळा,  इ  संस्थांना दरमहा आर्थिक मदत केली जाते. विविध शाळांना साहित्य  इत्यादी स्वरूपात , लोटस केअर सेंटर, कोल्हापूर या संसंस्थेस एड्स ग्रस्त रुगणांना  औषधोपाचार करण्यासाठी  मदत केली जाते.

 प्रीतम आनंदशाळा या ठिकाणी इनडोअर स्टेडिअमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्पोर्ट्स अकादमी सुरु करून देशभरातून मान्यवर क्रीडा  प्रशिक्षक  आणून त्यांचे मार्गदर्शनाखाली चांगले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यावर भर असेल असे संजय घोडावत यांनी सांगितले.
यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कामाजी  यांनी या उपक्रमास मदत केलेबद्दल संजय घोडावत फौंडेशन व पदाधिकारी यांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes