लोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री
schedule18 Apr 24 person by visibility 424 categoryराज्य
सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळाले. या एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यमाचा पोशाख आणि रेड्यावर बसून एक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. राम गायकवाड असे या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
राम गायकवाड हे मूळचे पंढरपुरचे असून माढ्यातून ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेली एन्ट्री आज चर्चेचा विषय बनली आहे.