SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटपकोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्त

जाहिरात

 

दुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासा

schedule18 Mar 26 person by visibility 93 categoryराज्य

कोल्हापूर : मौजे मोघर्डे, ता. राधानगरी येथील दुधगंगा डावा कालवा कि.मी. १३ सा.क्र. १२/२०० मी. येथील नादुरुस्त गेटमुळे पाणी वाया जात असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.

आपले सरकार पोर्टलवर टोकन आयडी DIS/WRED/KOLH/२०२५/१ अन्वये दि. ०२ मार्च २०२५ रोजी प्राप्त तक्रारीनुसार या गेटच्या दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. यांत्रिकी विभाग, कोल्हापूर यांनी या गेट दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, कामासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरीही मिळालेली आहे.

 महामंडळाच्या पत्र क्रमांक ७१३१ दि. १६ ऑक्टोबर २०२५ अन्वये मंजुरी देण्यात आली असून, कार्यारंभ आदेश दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या गेटच्या दुरुस्तीसाठी अस्तित्वातील संधानकाचे बांधकाम काढून झडप द्वार बसविणे व त्यानंतर पुन्हा बांधकाम पूर्ववत करणे आवश्यक आहे. या कामासाठी सुमारे ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कंत्राटदारांनी कळविले आहे. दरम्यान, डावा कालवा सा.क्र. ३/२९० येथील CR cum escape गेटच्या होईस्ट यंत्रणेतील रॉड तुटलेला असल्याने गेटमध्ये गॅप निर्माण झाला आहे. तसेच सा.क्र. ११/९४० गैबी येथील गेट दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही ठिकाणी गेट नादुरुस्त असल्यामुळे, डावा कालवा आवर्तन बंद असतानाही उजव्या कालव्यामधून सुमारे १०० क्युसेस पाणी डाव्या कालव्यात वाहत राहते. त्यामुळे गळतीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित गेटची दुरुस्ती प्रभावीपणे करण्यासाठी कालव्यातील पाणी पूर्णतः बंद करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. स्थापत्य व यांत्रिकी कामांचा समन्वय साधून दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे तिटवे दुधगंगा डावा कालवा उपविभाग क्र. 2 चे उपविभागीय अभियंता  उ.सु. माणकापुरे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes