SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणज्येष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मितीकोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चाअनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर'पीएसआय' पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यशनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणारसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढनॅशनल आयडियल टीचर अवॉर्डचे ७ सप्टेंबरला वितरणस्मृतीशेष डी. जी. राजहंस, डॉ. वसंत भागवत यांना जीवनगौरव जाहीरध्वनीक्षेपक वापराबाबत गणपती व ईद-ए-मिलादसाठी सुट जाहीर

जाहिरात

 

इशारा पातळी गाठताच नागरीकांना स्थलांतरीत करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी

schedule19 Aug 25 person by visibility 294 categoryमहानगरपालिका

▪️संभाव्य पूरस्थितीमुळे महापालिकेची निवारा केंद्रे सज्ज

कोल्हापूर  : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून ती इशारा पातळीकडे जात आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करता महानगरपालिकेने सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना पूरबाधित भागांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, इशारा पातळी गाठताच ज्या भागात पाणी शिरते तेथील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

   या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी आज सकाळी दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ व दिगंबर जैन बोर्डिंग निवारा केंद्राची पाहणी केली. या केंद्रांची संपूर्ण साफसफाई करून ती नागरिकांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. या पाहणीवेळी सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, युवराज जबडे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागामार्फत बोटी व आवश्यक अनुषंगिक साहित्यही सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याकडेला नदीचे पाणी आल्याने सदरचा रस्ता बॅरेकेट लावून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes