कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा 30 टक्के सवलत योजनेस दि.31 मार्च पर्यंत मुदतवाढ
schedule15 Mar 24 person by visibility 304 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने दि.16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 30 टक्के सवलत योजना देण्यात आली होती. या 30 टक्के सवलत योजनेस महानगरपालिकेच्या करआकारणी व वसुली विभागाच्यावतीने दि. 31 मार्च 2024 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेमध्ये शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दि.15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 टक्के सवलत योजनेमधून 7413 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. यामध्ये रू 10,66,86,382/-इतकी रक्कम जमा झाली आहे. तसेच दि.16 फेब्रुवारी 2024 ते दि.15 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेमधून 4430 इतक्या मिळकत धारकांनी लाभ घेतला आहे. यामधून रू 3,84,85,895/-.इतकी रक्कम जमा झाली आहे. घरफाळा विभागाकडे चालू आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2023 ते 15 मार्च 2024 अखेर रू 62,24,61,086/-इतका घरफाळा जमा झाला आहे.
तरी शहरातील थकबाकीदार असणा-या मिळकतधारकांनी या 30 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.