कोल्हापूर जिल्हा : कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे पहिलीच (वैरण बँक) कंपनी स्थापन
schedule08 Jul 23 person by visibility 1546 categoryउद्योग
🔴 गावोगावी वैरण बँक स्थापन होणे ही काळाची गरज : अरुण डोंगळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ )च्या ताराबाई पार्क कार्यालय येथे शिंदेवाडी तालुका कागल येथिल स्थापन झालेल्या कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संस्थेस देण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन योगेश खराडे, व संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ ने नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून दुध उत्पादकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. दुग्धव्यवसायामध्ये सकस वैरणीचे महत्व फार आहे. वैरणीचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज असून, दुध उत्पादकांना वैरणीची सहज उपलब्धता व्हावी. या उद्देशाने केंद्र शासन व एन डी डी बी च्या सहकार्याने १०० कंपन्या (वैरण बँका) स्थापन करण्याची योजना राबविली जात असून यायोजने अंतर्गत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र शासन व एन डी डी बी मार्फत (वैरण बँक) कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे पहिलीच कंपनी (वैरण बँक) स्थापन झाली असून या कंपनीच्या माध्यमातून दुध उत्पादकांना कमीत कमी दरामध्ये ओला व सुका चारा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे .तसेच लहान शेतकऱ्यांना वैरणीची बाजारपेठ उपलब्ध करून देणे , तरुण दूध उत्पादकांना उद्योजक बनिविणे हा आहे. या कंपनीच्या माध्यमातून हिरवा चारा निर्मिती, खरेदी,विक्री सायलेज निर्मिती विक्री,असे व्यवसाय व कार्य संस्थेच्या माध्यमातून होणार आहेत, या मुळे दुग्धव्यवसाय वाढीस चालना मिळणार असल्याने गावोगावी वैरण बँका स्थापन होणे हि काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ उदयकुमार मोगले, डॉ दयावर्धन कामत, भरत मोळे, योगेश खराडे, पुंडलिक खराडे, पांडुरंग ढेरे, महेश पाटील, प्रवीण आरडे,शशी गुजर ,योगेश तळेकर, सतीश चौगुले, अजित मोरबाळे, एकनाथ पवार, तानाजी खराडे,सुहास खराडे ,ज्योतीराम कुंभार, तसेच शेतकरी उपस्थित होते.