पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी
schedule05 May 26 person by visibility 114 categoryराज्य
कोल्हापूर : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद केलेल्या भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे.
▪️भोगावती नदी कार्यवाहीचा भाग-
राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज को.प. बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीव्या दोन्ही तिरावरील भागात 7 ते 8 मे या दोन दिवसांच्या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.
▪️पंचगंगा नदी कार्यवाहीचा भाग-
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते रुई कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तिरावरील भागात 9 ते 10 मे या कालावधीत शेतीसाठी वापरल्या जाणा-या उपसा यंत्रासाठी उपसाबंदी केली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.