SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरीस्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची सदस्यांसह झूम प्रकल्पास भेटजनगणना 2027 अंतर्गत महानगरपालिकेमार्फत जनगणना प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा पूर्णकोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील घरफोडीचा छडा; ३.४५ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंदमुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सामन्यावर लावला जात होता सट्टा; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तपंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदीमतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागरकागलमध्ये १७ मे रोजी जलद बुद्धिबळ स्पर्धा मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक

जाहिरात

 

कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील घरफोडीचा छडा; ३.४५ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंद

schedule05 May 26 person by visibility 117 categoryगुन्हे

कोल्हापूर :  येथील मुक्त सैनिक वसाहत परिसरात झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी संतोष बिरु यमकर यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने २० ग्रॅम सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम लंपास केली होती. 

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना, अक्षय महादेव बोकमूरकर (वय ३७, रा. काटे मळा) याने हा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुक्त सैनिक वसाहत येथील रिक्षा स्टॉपजवळ सापळा लावून अक्षय बोकमूरकर याला ताब्यात घेतले. 

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अक्षयने कौशल्यपूर्ण तपासानंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ३,४५,००० रुपये किमतीचे २३.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पूर्ण करून आरोपीला पुढील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या हवाली केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes