SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैनापूर येथील आरोग्य शिबिरात २८६ नागरिकांची तपासणीवारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीकोल्हापूर येथील बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य, शर्वरी कबनूरकर उपविजेतीराईट फ्लायर III: विमान वाहतूक इतिहासातील सुवर्णपानबदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्प

जाहिरात

 

वारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधी

schedule05 Oct 26 person by visibility 156 category

वारणानगर : वारणा विद्यापीठांतर्गत कार्यरत वारणा स्कूल ऑफ लॉ मधील ५ वर्षे व ३ वर्षे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या संस्थात्मक फेरीकरिता विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी व विकल्प अर्ज भरण्याची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे.

राज्य सीईटी सेलअंतर्गत ५ वर्षे व ३ वर्षे विधी अभ्यासक्रमांची केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया सुरू असून तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण झाली आहे. संस्थात्मक फेरीसाठी उमेदवारांना संबंधित महाविद्यालय अथवा विद्यापीठाचा विकल्प अर्ज भरणे बंधनकारक आहे. यासाठी नवीन अर्ज करणारे तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय फेरीत प्रवेश न मिळालेले उमेदवार पात्र आहेत.

५ वर्षे व ३ वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी वारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत नवीन नोंदणी करून वारणा विद्यापीठाचा विकल्प अर्ज भरावा, असे आवाहन वारणा स्कूल ऑफ लॉच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या केंद्रीयभूत पद्धतीनुसार होणार असून मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes