SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एकत्रित लढू; महायुतीतील सर्व पक्षांचा व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू : मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठककोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर; शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक चार्ज; शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार फुटपाथवरील अतिक्रमणावर कडक कारवाई : उच्च न्यायालयाचे निर्देश; कोल्हापूर महापालिकेची सोमवारपासून मोहीम सुरूख्रिस्ती दफनभूमीसाठी जागा निश्चित करासाळोखे नगर येथे पिरॅमल स्वास्थ फाउंडेशन व स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार हेल्थ डॉक केंद्राचे उद्‌घाटन आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीकेआयटी मध्ये ‘ स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ चे आयोजन अंतिम फेरीसाठी देशभरातील २८ संघ सहभागी होणारउत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरज्याचा वर्तमानकाळ आखीव असतो,त्याचा भविष्यकाळ प्रयत्नांच्या जोरावर रेखीव व प्रभावी होतो : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : आमदार राजेश क्षीरसागर; शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक चार्ज; शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार

schedule06 Dec 25 person by visibility 97 categoryराजकीय

कोल्हापूर  : नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद द्या असे आदेश शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थिती महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याची जबाबदार पदाधिकारी आणि शिवसैनिकांचीच आहे. शिवसैनिक पेटून उठले तर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसत नाहीत. हे प्रत्येक निवडणुकीत दाखवून दिले आहे. महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आताच्या निवडणुकीत शिवसैनिकांना मिळणार आहे. वातावरण चांगले आहे म्हणून गाफील राहू नका, एकसंघ रहा आणि महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या.

कोल्हापूर महानगरपलिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यास शिवसैनिकांच्या गर्दीने शाहू स्मारक भवन परिसर व्यापून गेला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे" यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. मेळाव्याच्या सुरवातीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

मेळाव्यात बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह महायुतीला घवघवीत यश मिळाले. या यशाचे सर्व श्रेय शिवसैनिकांचे आणि महायुतीसाठी रात्रदिवस झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सर्व्हे पाहता मतदारांचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने आहे. शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे हि भावना सर्वांचीच आहे. माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाच रान केले आता हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देणे माझं कर्तव्य आहे. कोणावरही अन्याय होणार नाही हि भूमिका असली तर सक्षम उमेदवार देणे काळाची गरज आहे. विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह सेट केले जातील पण त्याला आपण विकास कामातून आणि शिवसेनेच्या विकासाच्या व्हिजनने उत्तर देवून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम केले. गेल्या ५ वर्षात महायुतीकडून झालेले काम कॉंग्रेसला अखंड हयातीत जमलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ साली देश महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पातून काम सुरु आहे. जनतेत शिवसेनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. ही कामाची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचा. पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी सर्व्हे केला जाणार आहे. त्यामध्ये आपले नांव मतदारांच्या पसंतीस पडले पाहिजे. त्यामुळे कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

◼️महापालिकेसाठी शिवसेनाच फेवरेट : आमदार राजेश क्षीरसागर

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून, येत्या १५ दिवसांत इच्छुक उमेदवारांनी आप- आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त संपर्क साधा. शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. रस्ते, पाणी अशा मुलभूत सोई सुविधा देण्यासाठी शिवसेनाच पर्याय आहे, अशा पद्धतीचे काम सुरु आहे. पण पक्ष जो उमेदवार देईल त्याच्याच पाठीशी ठाम उभे राहणे आणि एकनिष्ठपणे धनुष्यबाणाचा प्रचार करणे ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीचा विचार करता महापालिकेसाठी शिवसेनाच फेवरेट आहे. व्यासपीठावर पाहिले तर बरेच भावी नगरसेवक दिसून येथील त्यात महत्वाचे म्हणजे यापूर्वी महानगरपालिकेत सत्तेतील प्रमुख आणि विरोधी पक्षातील प्रमुख हे दोघेही शिवसेनेत आहेत. त्यांचा महापालिकेतील अनुभव आता शिवसेनेकडे आहे. त्यावरून शिवसेनेची ताकत समजून येईल, असेही प्रतिपादन केले.    

यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी, इच्छुकांची संख्या शिवसेनेकडे सर्वाधिक आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. पण, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाजार होणार हे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो धनुष्यबाण हाच आपला उमेदवार समजून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन केले.

जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, महायुती सरकार कडून धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत. विकासाची हीच शिदोरी घेवून मतदारांना भेटा. एकनिष्ठपणे काम करा फळ नक्कीच मिळेल. युती झाली तर ठीकच पण स्वबळळावरही शिवसेना सज्ज आहे. जनतेला अपेक्षित युती आहे त्यामुळे वरिष्ठ त्याबाबतीत निर्णय घेतील. शिवसेनेला कोणीही कमी लेखू नये. यंदा विजयाचा गुलाल घेवूनच स्वस्थ बसू. आपले काम जनतेत पोहचवूया महायुतीची सत्ता येणार हे सांगायला आता ज्योतिषाचीही गरज नसल्याचे नमूद केले.

शिवसेना जिल्हा संघटक सत्यजित उर्फ नाना कदम म्हणाले, प्रत्येक वेळी महापालिकेत शिवसेनेचे ४ - ५ नगरसेवक असे टोमणे मारले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभेत आपण बाजी मारली. तीच उर्जा घेवून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. युती झाली तर प्रामाणिकपणे काम करुया. शिवसैनिकांवर कोणी अन्याय करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेच्या विरोधात कोणीही डमी उमेदवार येता कामा नये . हिंदुत्व जपण्याचे काम शिवसेनेन केलेय.. लाडक्या बहिणीही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. शिंदे साहेबांचे राज्यातील आणि आमदार क्षीरसागर यांचे जिल्ह्यातील काम लोकांपर्यत घेवून जावा. विधानसभेप्रमाणे याही निवडणुकीत कॉंग्रेस नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या काळात अनेकजण बदनामीकारक वक्तव्यांसाठी पुढे येतील, पण त्यांच्या टीकाना भिक न घालता आपले व्हिजन मतदारांपर्यंत नेवूया, असे आवाहन केले.  

माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम शिवसेनेने केले आहे. त्याचमुळे शिवसेनेला निवडणुकात एक नंबरची पसंती मिळत आहे. या चांगल्या वातावरणाचा फायदा करून घ्या. पुढील काळात शिवसेनेची पद्धतच महानगरपालिकेत राबेल. एकसंघपणे काम करून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणून आणूया. आतापर्यंत आम्ही केलेल्या पाहणीत १३ मतदारसंघातच ४० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार शिवसेनेकडे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्या- केल्या निधीची पूर्तता होते. कोट्यावधी रुपयांचा निधी या शहराला मिळाला आहे. त्यातून विकास कामे सुरु असल्याचे नमूद केले.

◼️ते... कावळा नाक्याच्या पुढे कधी नाहीतच : देशमुख

विधानसभेत पराभूत झालेल्या आणि एक वर्षाने उगवलेल्या उमेदवाराने परवाच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये किमान २० वेळा त्यांनी माझं कोल्हापूर असा उल्लेख केला.. पण ते उमेदवार प्रचार सोडून कधी कावळा नाक्याच्या पुढे आलेच नाहीत, असा उपहासात्मक टोला शारंगधर देशमुख यांनी राजेश लाटकर यांचे नांव न घेता लगावला. तसेच महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी, थेट पाईपलाइनच्या पाण्याने अंघोळ करताना बादली नेमकी कोणी दिली..??? त्यांनीच आणली का तुम्ही दिली, अशी कोपरखळी मारली. त्यावर देशमुख यांनी, थेट पाईपलाईन मध्ये किती पाणी मुरलंय आणि पाण्याला कुठले कलर दिले गेलेत हेही वेळ आल्यावर जाहीर करू, असे उत्तर देताच त्याला शिवसैनिकांनी टाळ्यांनी दाद दिली.

या मेळाव्यास जिल्हा संघटक विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, राहुल चव्हाण, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, प्रकाश नाईकनवरे, संभाजी जाधव, अजित मोरे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, अजय इंगवले, अस्कीन आजरेकर, नेपोलियन सोनुले, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, प्रशांत साळुंखे, अश्विन शेळके, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पवित्र रांगणेकर, अमरजा पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes