मुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्त
schedule28 Sep 26 person by visibility 145 categoryगुन्हे
कोल्हापूर : मुदाळ तिट्टा (ता. कागल) येथील बस स्टँडसमोरील परिसरात दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी एस टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले (मणी मंगळसूत्र) चोरीला गेले होते. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी रेकॉर्डवरील महिला आरोपी भिवरा पंडित लोंढे (वय ५०, रा. इस्पूर्ली, ता. करवीर) हिस ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली. तिने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून १,५२,००० रुपये किमतीचे २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले यशस्वीरित्या जप्त केले आहेत. सदर महिला आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.