SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीमुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्तराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरापार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकरउपद्रव शोध पथकाची धडक कारवाई सुरूच ठेवण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशरस्त्यावरील गणेश मंडप तातडीने काढण्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे आवाहनमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५जागतिक रेबीज दिन: कारणे, परिणाम आणि जनजागृती

जाहिरात

 

कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

schedule28 Sep 26 person by visibility 102 categoryक्रीडा

मुंबई  : कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्कर हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देण्यात सोनमने महत्वपूर्ण योगदान दिले. २० व्या आशियाई स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.

१० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारतीय संघाला मिळालेल्या एकूण १८९८.० गुणांपैकी सोनमने वैयक्तिक ६३४.१ गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

सोनम सध्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून तिचे वडील महानंद वितरक सहकारी पतसंस्था येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सोनमने दिल्ली, कोल्हापूरसह मुंबईत कामगार क्रीडा भवनाच्या शूटिंग रेंजमध्येदेखील सराव केला आहे.

मुंबई परिसरातील तसेच कामगार कुटुंबातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचवावे यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन निधीतून या रेंजची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या रायफल शूटिंग रेंजचे व्यवस्थापन केले जाते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उपसचिव रोशनी कदम पाटील, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे, उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी सोनम आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes