SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणीदूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढकामगारांची आस, शाहू मिलचा श्वास: मिल पुन्हा सुरू करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे साकडंहर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीकोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआड

जाहिरात

 

लिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात

schedule11 Aug 26 person by visibility 140 categoryराज्य

मुंबई :लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे सकारात्मक चर्चा झाली.विशेषतः जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महाविकास मंडळाच्या योजनांचा सरसकट लिंगायत समाजबांधवांना लाभ मिळावा तसेच जाचक अटी दूर करण्यात याव्यात,या प्रमुख मागणीवर शासन सकारात्मक असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.तसेच  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मा.उपमुख्यमंत्री सुनित्रा ताई पवार आणि यांच्या समवेतही लिंगायत समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत यापूर्वीही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज सकारात्मक दिशा मिळाली असून, लिंगायत समाजबांधवांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.

या पाठपुराव्यात बसव मृत्युंजय महास्वामीजी,आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर),आमदार शिवाजी  पाटील  आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राजेंद्रजी पाटील मंगेश दादा चिवटे,पैलवान नितीन पाटील मा संजय तेलनाडे तसेच लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने  मुख्यमंत्री महोदयांसह सर्व संबंधित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes