कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे आरोग्य शिबीर व लसीकरण
schedule31 Jan 26 person by visibility 198 categoryआरोग्य
कोल्हापुर : हज फौंडेशन, कोल्हापूर , लिम्रास चैरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आणि मुस्लिम वेल्फेअर फौंडेशन इचलकरंजी या तिन्ही समाजसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने
दि.२८ व २९ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा येथे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात एकूण २९९ पैकी २७५ हज यात्रेकरूंच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.त्यानंतर ३० जानेवारी रोजी जिल्ह्यातील २९९ पैकी २७५ हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,छत्रपती प्रमिला राजे जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा पाटील,उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नीलिमा पाटील,डॉ.उमेश कदम,डॉ.कदम, डॉ.चौगुले,मानसी घोलतकर,त्याचबरोबर नर्सिंग कर्मचारी,महा लॅब चे सर्व कर्मचारी, उपस्थित होते.
हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी हज यात्रेकरूं बरोबरच समीर मुजावर, इकबाल देसाई,इम्तियाज बारगिर,बाबासाहेब शेख, बालेचांद महालदार, शफी आत्तार ,यासीन उस्ताद, कलीम खान,आदिल देसाई,अस्लम मोमीन,समीर पटवेगार,बशीर कोठिवाले, समीर जमादार,जुबेर मुजावर, वसीम नाईकवाडे, अबुबकर मोमीन,मुनेरा कोठीवाले, यास्मिन जमादार यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.