किशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!
schedule09 Oct 26 person by visibility 127 categoryसामाजिक
कोल्हापूर : अतिशय प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न पुरस्कार स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर घाटगे यांना नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
गेली 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे किशोर घाटगे यांना शांतिदूत परिवार, डॉक्टर सुरेश राठोड फाउंडेशन सर्किट बेंच असोसिएशन, व इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या शांतिदूत इंटरनॅशनल समाज रत्न पुरस्कार कॉन्टिट्यूशनल क्लब नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, त्याचबरोबर खासदार रामचंद्र वडकुंजे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, डॉक्टर सुरेश राठोड, सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम अद्वितीय असून शांतिदूत इंटरनॅशनल समाज रत्न हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा असून यापूर्वी या पुरस्काराचे कार्यक्रम थायलंड जपान श्रीलंका या देशात झाले आहेत. देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात देश पातळीवरील व प्रदेशातून आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यामुळे जगात विश्वशांती व आपल्या देशाबद्दल देशभक्तीची भावना निर्माण होईल.
यावेळी डॉक्टर सुरेश राठोड शांतिदूत परिवार त्याचबरोबर इंडियन मित्र पोलीस भारत संघटना, सर्किट बेंच असोसिएशनचे पदाधिकारी परमाने मॅडम, यशश्री घाटगे. यांचे सह मोठ्या संख्येने विविध सामाजिक क्षेत्रातील देश व परदेशातून आलेले मान्यवर उपस्थित होते.