मेन राजाराममध्ये झिम्मा फुगडी, गौरी गीत गायन उत्साहात
schedule30 Aug 25 person by visibility 834 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या मुलींसाठी सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासाठी झिम्मा फुगडी,गौरी गीते, उखाणे म्हणणे यासारखे विविध खेळ घेण्यात आले. हे खेळ महिलांच्या शारीरिक चपळतेसाठी,तणावमुक्तीसाठी, शारिरीक , मानसिक, भावनिक निरोगी,सदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहेत.तसेच या खेळांमुळे मुली एकत्र येऊन सामाजिक वातावरण सलोख्याचे ,एकमेकांशी संवाद होण्यासाठी, दैनंदिन कामातील कंटाळा दूर होऊन तणावमुक्त जीवन प्रसन्नपणे जगता येते, यामुळे घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेमुळे आनंदी व उत्साही बनते.
या सात्विक हेतूने मेन राजाराम कॉलेज च्या विद्यार्थिनींनी गौरी गीते, झिम्मा फुगडी,उखाणे,वेगवेगळी कोडी घालणे असे विविध खेळात सहभागी झाल्या .आपल्या संस्कृतीचे दर्शन त्यांच्या या पारंपरिक खेळातून दिसून आले.
या उपक्रमात सर्व मुली सकारात्मक सहभागी झाल्या.त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन प्राचार्य डॉ गजानन खाडे, उपप्राचार्य प्रा वनिता खडके, प्रा सुषमा पाटील,प्रा अयोध्या धुमाळ,प्रा दिपा लोहार, प्रा रेश्मा पाटील,प्रा प्रमिला मळगे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी दिले.