SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षण

जाहिरात

 

‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्याय

schedule10 Aug 26 person by visibility 546 categoryराजकीय

◼️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालयात शासकीय कामांचा निपटारा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार  रवींद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यालय, नागाळा पार्क येथे सामान्य नागरिक तसेच भाजप पदाधिकारी यांच्या विविध प्रलंबित शासकीय प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला.
या अभियानामध्ये शैक्षणिक, महसूल, शासकीय निधी, पोलीस प्रशासन तसेच शालेय शिक्षण आदी विषयांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी  संतोष साखरे यांनी आपल्या टीमसह दिवसभर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जवळपास २०० ते २५० नागरिक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्यवाही करून त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय दादा जाधव व भाजप कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहून अभियानाचे नियोजन व समन्वय केला. याप्रसंगी सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, भाजप अनुजा मोर्चाचे अध्यक्ष अनिल कामत उपस्थित होते.

अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुजा मोर्चाचे प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, संतोष तिवडे, सचिन सुतार, अमोल मांगले, लालासो पवार, नामदेव कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्या संबंधित शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करणे आणि प्रश्न सोडविणे, हा ‘सेवा अभियानाचा’ मुख्य उद्देश असल्याचे  साखरे यांनी सांगितले. नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes