SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कार

जाहिरात

 

‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावे

schedule03 Oct 26 person by visibility 303 categoryसामाजिक

मुंबई : निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ‘महा-उपलब्धी’ अधिकृत मोबाईल ॲपच्या वापराबाबत ६ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे.

वित्त विभाग, मंत्रालय, संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत एमएमआरडीए, न्यू बिल्डिंग, पोडियम सभागृह, जिओ वर्ल्ड ड्राईव्हसमोर, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. 

‘महा-उपलब्धी’ ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या त्यांच्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म-१६ तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित शासन निर्णय आदी माहिती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

कार्यशाळेस उपस्थित राहताना मुंबईतील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेला स्मार्टफोन सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे YouTube वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून त्याची लिंक यथावकाश संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘महा-उपलब्धी’ ॲपचा प्रभावी वापर समजून घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असेही अधिदान व लेखा कार्यालयाने कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes