SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेषआवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभकिशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत वितरण महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादनशाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळेमहात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरामहात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात

जाहिरात

 

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षण

schedule03 Oct 26 person by visibility 158 categoryउद्योग

कोल्हापूर : प्लंबिंग क्षेत्रातील कामगार, व्यावसायिक व दुकानदारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या ‘इंडियन प्लंबिंग असोसिएशन’च्या (IPA) कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ (इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत प्लंबिंग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, तांत्रिक ज्ञान आणि रोजगाराच्या संधींची माहिती दिली जाणार असून, या स्पर्धेचा शुभारंभ ३ ऑक्टोबरपासून होत असल्याची माहिती चॅप्टरचे उपाध्यक्ष किरण जोशी यांनी दिली आहे.

विशेष प्रशिक्षण व स्पर्धा सत्र
या उपक्रमांतर्गत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या दिवशी विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत. दि. ३, १० आणि १७ ऑक्टोबर रोजी रोटरी समाज केंद्र (खानविलकर पंपासमोर) येथे हे प्रशिक्षण दिले जाईल.

 यात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तांत्रिक सादरीकरण आणि प्रायोजक कंपन्यांकडून आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दि. २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.


हा संपूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम दोन जण एकत्रितपणे पूर्ण करू शकतात; म्हणजेच या स्पर्धेसाठी दोन सदस्यांची एक टीम असणार आहे. प्रशिक्षण आणि परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तसेच, या परीक्षेत उत्कृष्ट गुणवत्ता मिळवणाऱ्या गुणवंत उमेदवारांना चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी पाठवले जाणार आहे.
प्लंबिंग हे क्षेत्र पारंपरिक असले तरी यामध्ये रोजगाराच्या आणि प्रगतीच्या मोठ्या संधी नवोदिकांना उपलब्ध आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा आणि सचिव मनीष जैन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कोल्हापूर चॅप्टरचे रवी साळुंखे, किरण जोशी, देवांग शेठ, गिरीश कुलकर्णी, सुशांत नांगरे आणि शीतल पाटील हे या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी मधु किरण, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes