+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustयुपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule02 Apr 24 person by visibility 348 categoryउद्योग
इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 हा 31 वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. या हंगामामध्ये 120 दिवसात 16 लाख 18 हजार 306 मेट्रीक टन इतके ऊस गाळप केले.

हंगाम सांगता प्रित्यर्थ कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर हंगामात उत्पादित साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले. 

31 व्या ऊस गाळप हंगामासाठी 11 ऑक्टोबर 2023 रोजी बॉयलर अग्निप्रदीपन होऊन 25 नोव्हेंबर 2023 रोजी ऊस गाळपास सुरुवात झाली. या हंगामात कारखान्याकडे 16450 हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला. चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी 98 मे.टन इतके ऊस उत्पादन मिळाले, मागील हंगामात ते 95 मे. टन होते.

गाळप हंगाम 2023-24 साठी ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी 10 कोटी 43 लाख 84 हजार इतक्या रकमेचे वाटप केले. त्यामध्ये 66 लाख 72 हजार इतके अनुदान दिलेले आहे. या हंगामाकरीता तोडणी वाहतूकीसाठी 1 ट्रक, 412 ट्रॅक्टर, 493 ट्रॅक्टर टायरगाडी व 292 बैलगाडी आणि 53 ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा होण्यास मदत झाली. ऊस उत्पादक सभासद व शेतकर्‍यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले.  

पुढील हंगामामध्ये या वषर्षापेक्षाही अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकर्‍यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, आदगोंडा पाटील, कमल पाटील, सुकुमार किणींगे, सूरज बेडगे, गौतम इंगळे, शितल आमण्णावर, सुमेरु पाटील, दादासो सांगावे, माजी चेअरमन उत्तम आवाडे, माजी संचालक धनंजय मगदूम, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कामगार प्रतिनिधी सर्जेराव हळदकर तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.