SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्केअंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन; डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यानडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट 'एक्सलंट' श्रेणीत; उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर

जाहिरात

 

कोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

schedule02 Jul 25 person by visibility 248 categoryगुन्हे

कोल्हापूर  : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यातआली. त्यांच्याकडून सोन्याचे दागीने, ० २ मोबाईल, एक दुचाकी मोटर सायकल असा एकूण २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली. 

 कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले जबरी चोरी व मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने गुन्हा घडलेली ठिकाणे, वेळ व पध्दत याचा तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना पोलीस अमंलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे व समीर कांबळे यांनी चंदगड व गडहिंग्लज भागातील जबरी चोरीचे गुन्हे घडकीस आणणेच्या दृष्टीने चंदगड व गडहिंग्लज परिसरातील सीसीटीव्ही कॅमरे व गोपनिय बातमीदार यांचेकडून माहिती घेतली व त्यामधुन चंदगड व गडहिंग्लज मध्ये जबरी चोरी करणारे इसमाचे फुटेज प्राप्त करुन घेतले, फुटेजच्या आधारे संशयीत आरोपीची माहिती घेत असताना जबरी चोरी करणारे इसम हे हरळी बुद्रुक या गावातील असुन ते दि.०२.०७.२०२५ रोजी आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना गडहिग्लज येथे स्प्लेंडर मोटर सायकल वरुन येणार असलेची गोपनिय माहिती मिळाली, मिळाले माहितीचे आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथकाने ए-१ चिकन सेंटर आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना गडहिग्लज येथे सापळा रचुन स्प्लेंडर मोटर सायकलवरील दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांनी त्यांची नावे १) देवेद्र दिंगबर पताडे वय १९ रा. विठठल मंदीर वरची गल्ली हरळी बुदुक ता. गडहिग्लंज जि कोल्हापुर २) बाळु परशराम नाईक वय २८ रा. नाईकवाडी जरळी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर अशी सांगीतली. त्यांची अंगझडती असता त्यांचे कब्जात ओपो कंपनीचा एक व व्हीओ कंपनीचा एक असे दोन मोबाईल हँण्डसेट मिळुन आले. मिळाले गोपनिय माहिती प्रमाणे नमुद इसमांचेकडे चंदगड पोलीस ठाण्यात दाखलगुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे सखोल विचारपूस केली असता आरोपी देवेंद्र पताडे याने सांगीतले की, गेल्या पाच- सहा दिवसापुर्वी तो व त्याचा मित्र बाळु नाईक असे दोघांनी जक्कनहटटी रोड निठुर येथुन रात्रीचेवेळी जात असताना एका घरामध्ये जावुन घरातील वयस्कर महिलेकडे पिण्याचे पाणी मागणी करुन वयस्कर महिलेच्या गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसडा मारुन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मंगळसुत्र तुटुन तेथेच पडले होते त्यावेळी वयस्कर महिलेने आरडा ओरडा केलेने घरातील वयस्कर इसम व एक लहान मुलगा तेथे आला ते दोघेजण त्यांचेकडे येत असलेचे पाहुन दोघांनी कोयत्याने वयस्क इसमास व लहान मुलास मारहाण करुन जबर जखमी करुन तेथुन पळुन गेलो होतो अशी हकीकत सांगुन आपण गुन्हा केलेचे कबुली दिली.

त्याप्रमाणे आरोपी देवेंद्र पताडे याने व त्याचा साथीदार असे दोघांनी गेल्या सहा महिन्यापुर्वी गडहिग्लज येथील निर्जनस्थळी एका वृध्द महिलेला चाकुने मारहाण करुन तिचे गळयातील बोरमाळ व मंगळसुत्र चोरी केलेचे सांगीतले तसेच गुन्हयात चोरीस गेलेली बोरमाळ व मंगळसुत्र असा १४ ग्रॅम वजनाचा मुददेमाल हस्तगत केला सबब दोन्ही आरोपीकडुन चंदगड व गडहिंग्लज पोलीस ठाणेकडील जबरी चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागीने व गुन्हयात वापरलेली दुचाकी मोटसायकल असा एकुण २,४०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करुन चंदगड पोलीस ठाणे व गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील दोन जबरी चोरीचे गुन्हे घडकीस आणले आहेत. आरोपींना त्यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह अधिक तपासकामी चंदगड पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास चंदगड पोलीस ठाणे यांचेकडुन सुरु आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  योगेश कुमार  व अपर पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, समीर कांबळे, सतिश जंगम, अरविंद पाटील, अमित सर्जे, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र वरडेंकर यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes