कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १८ मधून युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव निवडणूक रिंगणात....
schedule20 Dec 25 person by visibility 107 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात लोकहित, विकास आणि निष्ठेचा ठसा उमटवणारे दिवंगत आमदार चंद्रकांत (आण्णा) जाधव आज आपल्यात नाहीत… पण आण्णांचे विचार, कार्य आणि जनतेशी असलेली नाळ आजही तितकीच जिवंत आहे... त्या विचारांचा, त्या संघर्षाचा आणि त्या विश्वासाचा वारसदार म्हणजे सत्यजित चंद्रकांत जाधव. जनतेच्या आग्रहास्तव युवा उद्योजक, अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व सत्यजित चंद्रकांत जाधव प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवत आहेत.
ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही तर ही निवडणूक आहे आण्णांच्या स्वप्नांची, कोल्हापूरच्या विकासाची आणि तरुण नेतृत्वाच्या संधीची.
माजी आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे संस्कार, आण्णांच्या संघर्षाची शिदोरी आणि नव्या पिढीचा आत्मविश्वास म्हणजे युवा उद्योजक सत्यजित जाधव.
सत्यजित जाधव म्हणजे केवळ नाव नाही, तो विश्वास आहे. जनतेसाठी झटणारा, विकासासाठी कटिबद्ध आणि कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज असलेला. प्रभाग १८ मधील मतदारांनी निर्णय घ्यावा आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.





