कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 160 गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था
schedule01 Sep 25 person by visibility 262 categoryराज्य

कोल्हापूर : घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून महापालिकेच्यावतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी 160 गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदरचे विसर्जन कुंड आज पाण्याच्या टँकरद्वारे भरुन ठेवण्यात आलेले आहेत. या विसर्जनाच्या कामकाजासाठी अडीच हजाराहून अधिक कर्मचा-यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. हे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये सकाळी 10 वाजलेपासून विविध ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांच्यावर विविध ठिकाणच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच तांबट कमान येथील विसर्जन कुंडाची व इराणी खणीची अग्निशमन विभागाच्या बोटीद्वारे स्वच्छता करण्यात आली आहे.
इराणी खण येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी मंगळवारी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले असून गणेश मुर्ती संकलनासाठी 205 टँम्पो 480 हमाल, 7 जे.सी.बी., 7 डंपर, 8 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 ॲम्बुलन्स व 5 साधे तराफे व 10 फलोटींगचे तराफे, यावर्षी पहिल्यांदाच 1 क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सर्व साधन सामग्रीसह तैनात करण्यात येत असून विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी मोठी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या 13 टिम तयार करण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पवडी विभागाकडून नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन टॅम्पोमधून वाहतूक करुन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
विसर्जन स्थळाजवळील निर्माल्य गोळा करणेचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 13 आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 4 प्रमाणे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे.
तरी शहरातील नागरिकांनी महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्येच गणेशमुर्ती व निर्माल्य देऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.