SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीरदंतवैद्यक महाराष्ट्र राज्य संघटनेत डॉ. अभिजित वज्रमुष्टी, डॉ. दिग्विजय पाटील पदाधिकारीसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स मध्ये घवघवीत यशकोल्हापूर पंचगंगा नदी घाट येथे पाय घसरून पाण्यात पडलेल्या वृद्ध महिलेला जीवदानशिवाजी विद्यापीठ येथे सॉफ्ट स्किल्स व करिअर विकास विषयक दोन दिवसीय कार्यशाळापदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी मतदार याद्या तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम घोषितकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य निवडणूक कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक संपन्नजातिवंत म्हैशींच्या संगोपनातून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती शक्य : अभिजीत तायशेटे

जाहिरात

 

‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर

schedule18 Dec 25 person by visibility 72 categoryसामाजिक

▪️पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार

कोल्हापूर :   'पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया' (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना व कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. 

नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुख व  वरिष्ठ प्राध्यापक डॉ. निशा मुडे पवार, उपाध्यक्षपदी ‘नँक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील तर सचिव पदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारणीत सह सचिवपदी डॉ.अनुराधा इनामदार तर कोषाध्यक्ष पदी तुतारी जाहिरात संस्थेचे प्रमुख सचिन मोरे यांची नियुक्ती झाली आहे. 

समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेखर, जेष्ठ पत्रकार व दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ.अंबादास भास्के, कणेरी मठ कोल्हापूरचे विवेक सिद्ध यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर कोल्हापूर चॅप्टरच्या सल्लागार समितीत महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस.पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सहायक संचालक रवींद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांची तर विद्यार्थी नोंदणी समितीत अहमदनगर कॉलेजचे प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील डॉ.नितीन रणदिवे, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ.वृषाली बर्गे, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. तेजस्विनी कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रसिद्धी समितीत संवादतज्ञ चंद्रकांत कबाडे, लोकमतचे पत्रकार डॉ.शेखर वानखेडे, कृष्णा हॉस्पिटल कराडचे जनसंपर्क अधिकारी सुशील लाड व विवेक पोर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे. 

🔸‘पीआरएसआय’ संस्था १९६६ पासून देशपातळीवर कार्यरत
जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समजात जागृती, जनसंपर्क मुल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी सबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे इत्यादी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे. 

🔸पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार
पीआरएसआय ही माध्यम क्षेत्राशी सबंधित ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी व्यावसाईक संघटना आहे. या संस्थेच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत व्यावसाईक, माध्यम क्षेत्रातील प्राध्यापक, पत्रकार व या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील तज्ञ मंडळींचे ज्ञान व अनुभव सर्वाना स्थानिक पातळीवर मिळणार आहे. या सर्वात जास्त फायदा पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील विद्यार्थांना होणार आहे, असे मत सचिव विश्वजीत भोसले यांनी व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes