शिवाजी विद्यापीठात बुधवारी संपत मोरे यांचे व्याख्यान
schedule01 Dec 25 person by visibility 39 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील क्रांतिअग्रणी जी.डी. (बापू) लाड अध्यासनाच्या वतीने येत्या बुधवारी (दि. ३) सकाळी ११.०० वाजता मराठी अधिविभागात लेखक व पत्रकार संपत मोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी जी. डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रतिसरकारची चळवळ आणि मराठी साहित्य’ या विषयावर मोरे बोलणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार असतील. या व्याख्यानाचा जिज्ञासूंनी, अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.