नेहरु हायस्कूल व ज्युनि. कॉलेजला विदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट
schedule01 Dec 25 person by visibility 84 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू स्कूल ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथे अमेरिकेतील प्रतिष्ठित डेन्व्हर विद्यापीठाच्या विद्यार्थीनींनी सदिच्छा भेट दिली. कोल्हापुरातील सामाजिक कार्य करणाऱ्या ‘अवनी’ संस्थेमार्फत ही भेट आयोजित करण्यात आली होती.
या खास प्रसंगी डेन्व्हर विद्यापीठातील केरन पेन्शन, जियाना गाराफोलीन, लिली टेन्सील, डायओरा वुड्स, चॅडी निया, साराई ॲडुवार, टेरेसा रॉडरिग्ज, रुबी गॅरी, निक्की ॲलन, सामंथा गरबर, ब्रुक पिच या विद्यार्थिनींसह त्यांच्या शिस्तमंडळ प्रमुख स्कॉट कॅफोरा यांनी शाळेला भेट दिली.
शाळेतील विद्यार्थी–विद्यार्थिनींनी पाहुण्यांशी मनमोकळा संवाद साधत मुलाखत घेतली. विचारांची देवाणघेवाण, फोटोसेशन आणि स्वाक्षरी कार्यक्रम यामुळे वातावरण उत्साही आणि आनंददायी झाले.
या कार्यक्रमाला शालेय समितीचे चेअरमन रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय फुटबॉलपटू अश्कीन आजरेकर, शाळेचे मुख्याध्यापक काझी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन शाळेचे सह शिक्षक जिलानी शेख यांनी केले.
शाळेतील विद्यार्थिनी कुमारी इकरा काझी हिने शाळा व संस्थेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले, तर कुमारी सारा शेख हिने इस्लाम धर्माचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. संपूर्ण भेटीत परदेशी विद्यार्थीनींनी शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे आणि संस्कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले.