SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रमवाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईबिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाईडीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अ‍ॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवडकाळम्मावाडी सबस्टेशनवरील महावितरणच्या कामामुळे 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबानेरंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्तावडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका 2026’ आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णयवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफपहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्ष

जाहिरात

 

वाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

schedule28 Aug 26 person by visibility 134 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूरमधील बहुचर्चित वाशी नाका फायरिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश रमेश खाडे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कागल येथून बेड्या ठोकल्या आहेत. १६ जुलै २०२६ रोजी वाशी नाका सिग्नल ते फुलेवाडी रिंगरोडवरील स्टार लोकल मार्केटजवळ सुरज हणमंत साखरे हा त्याच्या ऑफिस गाळ्याच्या कामाची पाहणी करून बाहेर येत असताना, दोन अनोळखी इसमांनी त्याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राने फायरींग करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी आशुतोष अमित नाईक यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी ५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, काडतुसे आणि वाहने हस्तगत केली होती. सखोल तपासात लक्षतीर्थ वसाहत येथील गणेश रमेश खाडे यानेच सुरज साखरेच्या खुनासाठी सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी गणेश खाडे हा कागल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ कागल येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संदीप पाटील, वसंत पिंगळे, अनिकेत मोरे, अरविंद पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकाने पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes