कागलच्या पाझर तलावातील जलतरण स्पर्धेत २०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभाग
schedule27 Sep 26 person by visibility 96 categoryक्रीडा
🟩 नेदरलँडसह विविध राज्यांतील जलतरणपटूंचा सहभाग
🟩 उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा संपन्न
कागल : कागल शहरातील एक विलक्षण प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या पाझर तलाव येथे अपेक्स एंडूरन्स अकॅडमी आणि कागल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला देश-विदेशातील २०० हून अधिक जलतरणपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेदरलँडमधील सुप्रसिद्ध आणि जेष्ठ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोरीना वॅन डॅम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या प्रेरणेने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा नियोजनबद्ध व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अपेक्स एंडुरन्स अकॅडमी आणि पाझर तलाव टीमने विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेत महाराष्ट्रातील नवी मुंबई, ठाणे, नांदेड, पुणे, नागपूर आदी विविध जिल्ह्यांसह ओडिशा, तामिळनाडू, गुजरात यांसह अन्य राज्यांमधून आलेल्या २०० हून अधिक स्पर्धकांनी या जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यामुळे पाझर तलाव परिसरात दिवसभर जलतरणपटूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली.
🟩 स्पर्धेतील विविध गटांमधील १० किलोमीटर वरील विजेत्यांची नावे अशी.....
६९ वर्षावरील गट: नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कोरीना वॅन डॅम.
४५ ते ६० वर्षे गट: भारतवीरसिंग देवरा- कोल्हापूर
३५ ते ४५ वर्षे गट: धीरेन ओसवाल- कोल्हापूर
१६ ते २९ वर्षे गट: पुरुष विभाग- रुद्र मनाडे- कोल्हापूर. महिला विभाग- हस्ती धरमशी- डोंबिवली.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना ॲकॅडमीच्यावतीने पदक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रविण काळबर, नगरसेवक अमित पिष्टे, युवा नेते नवाज मुश्रीफ यांच्यासह कागल नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका तसेच अपेक्स एंडुरन्स अकॅडमी आणि पाझर तलाव टीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाझर तलाव बोटिंग क्लबच्या कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध राज्यांतील तसेच परदेशातील स्पर्धकांनी पाझर तलावाच्या नैसर्गिक वातावरणाचे कौतुक केल्याने कागलच्या पर्यटन आणि क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळण्यास या उपक्रमाची मदत झाली.