SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात ३० सप्टेंबरला ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळाकोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढकोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवशिरोळ तालुक्याला दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार यड्रावकर फिरण्याची दुनिया आणि आपले जग: जागतिक पर्यटन दिनसेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध आरोग्य उपक्रमबाप्पांचे विसर्जन, अन् मार्गावर ३० टन कचऱ्याचा डोंगर; कोल्हापूर महापालिकेने अवघ्या काही तासांत परिसर केला चकाचक!कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू; जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलतीडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात

जाहिरात

 

महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ

schedule27 Sep 26 person by visibility 157 categoryराज्य

🟩 ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार
🟩 दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

◼️बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

◼️प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही
कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.

◼️बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष
राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes