SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुक: दुसऱ्या दिवशी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह १२ उमेदवारांचे अर्ज दाखललोकोपयोगी कामे करुन सेवा संकल्प अभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधआरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पणविज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्माडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयशगोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीगौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिन

जाहिरात

 

गोकुळ निवडणुक: दुसऱ्या दिवशी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

schedule16 Sep 26 person by visibility 160 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर दूध संघ (गोकुळ) निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज दिवसभरात १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, यात माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, त्यांची सून पल्लवी आणि मुलगा सचिन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय सुरेश कुराडे, रेखा कुराडे, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष सुरेश देसाई, हंबीरराव वाळके, वंदना भाऊके आणि विकास पाटील यांनीही आपले अर्ज अधिकृतरीत्या दाखल केले आहेत.

निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल ६०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर आज दिवसभरात १३० उमेदवारी अर्जांची विक्री व नोंदणी झाली. यावरून उमेदवारांमधील चुरस किती टोकाला पोहोचली आहे, हे स्पष्ट होते. यामध्ये सर्वसाधारण गटातून ६, तर ओबीसी आणि महिला गटातून प्रत्येकी ३ अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अवसायनातील ४९२ दूध संस्थांच्या मतदारयादीतील समावेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज न्यायालयानं फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोकुळच्या मतदारयादी संदर्भातील सर्व वाद आता  संपुष्टात आले असून, निवडणुकीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes