SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लोकोपयोगी कामे करुन सेवा संकल्प अभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधआरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पणविज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्माडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयशगोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीगौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाई

जाहिरात

 

लोकोपयोगी कामे करुन सेवा संकल्प अभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

schedule16 Sep 26 person by visibility 164 categoryराज्य

• शासकीय योजनांची व्यापक प्रसिद्धी करा
•  अभियानात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांची व्यापक प्रसिद्धी करा. या अभियानात अधिकाधिक लाभार्थ्यांचा सहभाग घ्या. लोकोपयोगी कामे करुन हे अभियान यशस्वी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच भावनेतून राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, सेवा संकल्प अभियान राज्यभर राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट काम होण्यासाठी चोख नियोजन करुन त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करा. या अभियानांतर्गत 2011 पर्यंत शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची आवश्यक ती कारवाई हाती घ्या. येत्या 1 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम राबवा. 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. आरोग्य तपासणी करुन घ्या. तसेच अवयवदान करण्यासाठी अर्ज भरा. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी दीप प्रज्वलित करा. शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट यशोगाथा तयार करुन त्याची प्रसिद्धी करा. सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजनांवर आधारित मानवी व रंगीत रांगोळ्यांचे सादरीकरण करा. बळीराजा शेत व पाणंद रस्त्यांची कामे करा, ॲग्रीस्टॅक नोंदणी करा. शालेय स्तरावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करा. अंगणवाड्यांमध्ये उपक्रम राबवा. कलापथक, नाट्यपथकाद्वारे शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करा. "चला शाळेत जाऊया" या उपक्रमाद्वारे शाळांना भेटी देऊन शाळेतील सुविधा आणि गुणवत्तेची पाहणी करा. या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असून देशात अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न करा. या अभियानांतर्गत लोकोपयोगी कामांवर भर द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या. 

  जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सादरीकरणातून सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध विभागांनी घ्यावयाचे कार्यक्रम व उपक्रमांबाबत माहिती दिली. या अभियानांतर्गत सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवाज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, रांगोळी, नमो सेवागाथा, जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

  या अभियानात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची व केलेल्या नियोजनाची माहिती उपस्थित विभाग प्रमुखांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes