SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार; अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान शिक्षणाला नवे बळ‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणार

जाहिरात

 

डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार; अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान शिक्षणाला नवे बळ

schedule05 Feb 26 person by visibility 106 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  डीकेटीई इचलकरंजी व वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली यांच्यात शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थामधील शैक्षणिक, संशोधनात्मक व तांत्रिक सहकार्य अधिक दृढ होणार असून विद्यार्थ्यांना अद्यायावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे.
या प्रसंगी वॉलचंद कॉलेजचे डायरेक्टर प्रा. डॉ. सुरेंद्रसिंग राठोड, प्रा. डॉ.डी.बी. कुलकर्णी, प्रा. डॉ एस.जी. ताम्हणकर व प्रा. डॉ. रश्मी गायकवाड यांनी डीकेटीईस भेट दिली यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्या हस्ते कराराचे आदान प्रदान झाले. 

वॉलचंदच्या शिष्टमंडळाने डीकेटीईच्या विविध विभागांची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मशिनरी, वर्कशॉप्स, लायब्ररी, अत्याधुनिक सुविधा पाहिल्या. डॉ. सुरेंद्रसिंग राठोड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तमोउत्तम शिक्षण देणारी डीकेटीई ही अघाडीची संस्था आहे असे गौरवउदगार यावेळी व्यक्त केले.

करारांतर्गत विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वॉलचंद कॉलेज येथे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थी व प्राध्यापक यांना दोन्ही संस्थामध्ये संशोधन व प्रॅक्टीकल करणे शक्य होणार आहे. वॉलचंदचे प्राध्यापक डीकेटीई येथे येवून विद्यार्थ्यांना शिक्षण देतील. या अंतर्गत संयुक्तपणे सेमिनार्स राबविणे, कार्यशाळा राबविणे, कॉन्फरन्स आयोजित करणे, संयुक्तपणे पेटंट तयार करणे, संशोधनात्मक लेख विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिध्द करणे, प्रशिक्षण आयोजित करणे, ज्ञानांची देवाणघेवाण करणे इ. अनेक बाबींचा समावेश आहे.

 अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे करारासाठी मार्गर्शन मिळाले. या कराराप्रसंगी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.के.शिरगांवे,डॉ.डी.व्ही. कोदवडे, डॉ.टी.आय.बागबान व प्राध्यापक उपस्थित होते. करारासाठी डॉ.व्ही.व्ही. खेराडकर यांनी कार्य पाहीले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes