SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणारजिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

जाहिरात

 

महापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

schedule04 Feb 26 person by visibility 96 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीनंतर नूतन महापौर व उप-महापौर यांची निवड प्रक्रिया शुक्रवार, दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेमध्ये संपन्न होणार आहे. सदर निवडणूक जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज महापालिकेत पाहणी केली. यावेळी त्यांनी सभागृहात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची, नूतन नगरसेवकांच्या प्रवेश व्यवस्थेची, पत्रकार व नगरसेवकांसाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेची तसेच इतर अनुषंगिक सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान पीठासन अधिकारी यांच्यावतीने उप-जिल्हाधिकारी संपत खिलारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागामार्फत महापालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, या मार्गावर केवळ नगरसेवक व पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच काळाईमाम तालीम जवळील ब्रेकफास्ट वडा सेंटर येथून महापालिकेकडे येणारा रस्ता तसेच बाजारगेट पोलीस चौकीजवळील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बाजारगेट परिसरात फक्त पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर व नूतन सदस्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत राबविले जाणार आहे. नूतन सदस्यांनी मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (EPIC), पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी कोणताही एक ओळख पुरावा सोबत आणणे अनिवार्य आहे. सभागृहात नूतन सदस्यांना सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सदस्य, मतदार व पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल. इतर कोणत्याही व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. सभागृहात सदस्यांव्यतिरिक्त अन्य नागरिक किंवा सदस्यांचे नातेवाईक यांना प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस विभागामार्फत ओळखपत्रांची तपासणी करूनच सदस्य व पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे ओळखपत्र परिधान करूनच सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सभेच्या कालावधीत मोबाईल फोनचा वापर टाळावा तसेच मोबाईल फ्लाइट मोड किंवा सायलेंट मोडवर ठेवणे आवश्यक राहील. महानगरपालिका चौकात महापालिकेच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सभेच्या कालावधीत प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर, शहर अभियंता रमेश मस्कर, नगरसचिव सुनिल बिद्रे, उप-शहर अभियंता सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes