SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार; अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान शिक्षणाला नवे बळ‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्दमतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदीमहापौर व उप-महापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीविविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची माहितीमहावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणार

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजी

schedule05 Feb 26 person by visibility 137 categoryक्रीडा

वारणानगर :राजेंद्र माने पॉलिटेक्निक, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित आय.इ.डी.एस.एस.ए. बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धा खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगर या महाविद्यालयाच्या बास्केटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवून झोन चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

या विजयी संघामध्ये सार्थक मुदगल, अलोक भोसले,मेघराज राऊत,आयुष शेवले,साद मुल्ला, मनीष सुर्यवंशी, हर्षल सुर्यवंशी, आदिराज पारगावकर,सचिन पाटील,इंद्रजीत सुर्यवंशी आणि श्रेराज पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

या स्पर्धेत बी-1 झोनमधील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. एक महिन्याच्या कठोर सरावासह शिस्तबद्ध खेळ आणि उत्कृष्ट संघभावनेच्या जोरावर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा) संघाने प्रत्येक सामन्यात आक्रमक व नियोजनबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व प्रस्थापित केले. अंतिम सामन्यातही संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी आणि डीन डॉ. एस. एम. पिसे,डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

संघाच्या या यशामध्ये क्रीडा शिक्षक श्री. एस. एस. चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील, प्रा. एस. बी. पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या विजयानंतर महाविद्यालय परिसरात खेळाडू व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes