पन्हाळा तालुक्यात विदेशी दारुची बेकायदेशीर वाहुतक करणाऱ्या एकास अटक; मुददेमाल जप्त
schedule22 Jan 26 person by visibility 42 categoryगुन्हे
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात विदेशी दारुची बेकायदेशीर चोरटी वाहुतक करणारा एकास अटक करून १,९१,३२५/-विदेशी दारु सह एकुण ३,६६,३२५ /- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे ने केली
दिनांक २१ जानेवारी रोजी तपास पथकाने मरळी ता पन्हाळा येथील ओढयाचे पुलावर सापळा लावुन वाहने तपासात असताना आलेला टेंपो अडवुन त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स दिसुन आले. वाहनातील चालक विशाल मदन कणसे (वय ३३ रा. उमा टॉकीज जवळ कोल्हापूर) तो शिवाजी पेठेतील टेम्पो मालक सम्राट माने यांच्या सांगण्यावरून तो चोरुन दारु विक्री करीत असुन त्यांचेकडे कोणताही दारु विक्री अथवा वाहतुकीचा परवाना नाही त्यामुळे त्यांचे कडुन १,९१,३२५/- रुपंयाची विदेशी दारु व वाहतुकीसाठी वापरणेत तीन चाकी टेंपोवाहन असे ३६६३२५/-रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपीं विरुध्द कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला असुन पुढील तपास कळे पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ.बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.